Monday 20 February 2023

जर मी शिक्षक झालो तर मराठी निबंध

 

जर मी शिक्षक झालो तर मराठी निबंध

(१०० शब्दात)

मला लहानपणा पासूनच शिक्षक व्हायला खुप खुप आवडते त्यामुळे मी जर शिक्षक झालो तर प्रत्येक विद्यार्थाला खूप आत्मयतेने शिकवण्याचा प्रयत्न करेन. मी शिक्षक बने पर्यंत जो काही ज्ञानाचा साठा मी कमावेल त्यातील कण कण मी विद्यार्त्यापर्यंत कसा पोहचेल यासाठी प्रयत्न करेल.

मी विद्यार्थांना चांगली शिकवण देईल, त्यांना चांगली शिस्त लावेल, वडीलधाऱ्या माणसांचा आदर करायला शिकवेल त्यांच्यावर उत्तम असे संस्कार करेल. जे की त्यांना भावी आयुष्यात एक आदर्श नागरिक होण्यासाठी मदत करतील.

जर मी शिक्षक झालो तर प्रत्येक विद्यार्थ्यास शिक्षणाची समान संधी देईल. सर्वांना सारखेच शिक्षण देईल, कोणत्याही विद्यार्त्याचा तिरस्कार करणार नाही. मी प्रत्येक विद्यार्थाला असे शिक्षण देईल की तो भविष्यात कुठे नोकरीला जरी नाही लागला तरी तो आपल्या देशाचा एक आदर्श नागरिक मात्र नक्कीच बनेल.